राज्यात विजांसह पावसाचा इशारा

राज्यातील मध्यम ते जोरदार पावसासह उन्हाचा चटका, उकाडाही कायम असल्याचे चित्र आहे. स्थानिक ठिकाणी ढगांची दाटी होत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.
rain
rainsakal
Summary

राज्यातील मध्यम ते जोरदार पावसासह उन्हाचा चटका, उकाडाही कायम असल्याचे चित्र आहे. स्थानिक ठिकाणी ढगांची दाटी होत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.

पुणे - राज्यातील कमी दाबाचा पट्टा, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र या पोषक प्रणालीमुळे राज्यात काही ठिकाणी विजा, मेघगर्जना, विजांसह पाऊस सुरू आहे. शनिवारी (ता. ११) पूर्व विदर्भासह, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील मध्यम ते जोरदार पावसासह उन्हाचा चटका, उकाडाही कायम असल्याचे चित्र आहे. स्थानिक ठिकाणी ढगांची दाटी होत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. रविवारी (ता. ११) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

शहरात ढगाळ वातावरण -

मागील दोन दिवसांपासून शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र या काळातही ढगाळ हवामान कायम होते. शनिवारी (ता. १०) दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होते. दिवसभर जोरदार सरी पडल्याची नोंद नाही. रविवारीही (ता.११) आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यातही ही स्थिती कायम राहणार असून, घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com