वाघ, सिंहांच्या मृत्यूची चौकशी करा - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - यवतमाळमधील अवनी वाघिणीच्या वादग्रस्त मृत्यूनंतर आता वाघ, सिंह आणि बिबट्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने जंगल क्षेत्रांच्या सीमा निश्‍चित कराव्यात, अशा मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. वाघ आणि सिंहांच्या 10 वर्षांतील आकस्मिक व संशयास्पद मृत्यूच्या घटनांबाबत चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलात कथित नरभक्षक अवनीला ठार करण्यासाठी वन विभागाने आखणी केली होती. परंतु तिचा मृत्यू वादग्रस्त ठरला, असे पर्यावरणप्रेमी नितीन देशपांडे यांनी ऍड. आशीष मेहता यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत म्हटले आहे. न्या. रणजित मोरे यांच्या खंडपीठापुढे बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली. याचिकेवर सुनावणी 7 जानेवारीला होणार आहे.

Web Title: Tiger Lion Death Inquiry High Court