एकट्या विदर्भातच ३५२ वाघ!

राज्यातील एकूण संख्या ३६०, सर्वाधिक ताडोब्यात
tiger in tadoba
tiger in tadobasakal

नागपूर : मार्जारकुळातील सर्वाधिक शक्तीशाली प्राणी म्हणजे वाघ. शक्तीचे प्रतीक असलेला हा प्राणी जंगलाची शानच. भारतातील विस्तीर्ण आणि घनदाट वनांमध्ये वाघांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात असून एकट्या विदर्भात ३५२ वाघ संचार करीत आहेत. तर राज्यातील एकुण वाघांची संख्या ३६० असल्याने वनविभागाने नमूद केले आहे.

वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेला पाठविलेल्या अहवालात विदर्भात ३५२ वाघ असल्याचे नमूद केले आहे. २०२० मध्ये केलेल्या प्रगणनेनुसार ही आकडेवारी पुढे आली आहे. चार वर्षानंतर होणारी प्रगणना यंदा करायची होती. मात्र, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाने वनमजूर महिलेवर केलेल्या हल्‍ल्यामुळे निर्धारित तारखेपर्यंत काही ठिकाणी प्रगणना पूर्ण झाली नाही. त्यामुळेच मागील वर्षीचाच अहवाल पाठविला आहे.

दर चार वर्षाची वाघांसह जंगलातील तृणभक्षक आणि इतरही प्राण्यांची स्थिती काय आहे याची माहिती घेण्यासाठी प्रगणना केली जाते. भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने २००६ मध्ये प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती. आता त्याच पद्धतीने व्याघ्र प्रगणनेची मोहीम राबविली जात आहे. २००६ ते २०२० पर्यंत दरवर्षी राज्यात २० ते २५ टक्के वाघांची संख्या वाढलेली आहे. त्यानुसार यंदाही वाघांची संख्या वाढणार आहे. ती ३६० वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने २०२१ या वर्षाचा विदर्भातील वाघ आणि तृणभक्षक प्राण्यांचा अहवाल तयार केला आहे. त्यात विदर्भात अंदाजे (३५९-४३३) वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात विदर्भात ३५२ वाघ असल्याची नोंद झालेली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोकण आणि जळगाव परिसरातही वाघाचे अस्तित्व आहे.

राज्य सरकारने राबविलेल्या सकारात्मक धोरण, वन संवर्धन आणि व्यवस्थापनामुळे राज्यात वाघांची संख्या सतत वाढत आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांनी केलेल्या जागरुकतेमुळेही संवर्धनाला मदत झालेली आहे. मात्र, वाघांची वाढलेली संख्या वनविभागासमोर आव्हान आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

वर्ष : वाघांची संख्या

  • १०३ - २००६

  • १६८ - २०१०

  • १९० - २०१४

  • ३१२ - २०१८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com