esakal | गर्दी रोखण्यासाठी तुम्हीच धोरण आणा, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi uddhav thackeray

गर्दी रोखण्यासाठी तुम्हीच धोरण आणा, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: कोरोना व्हायरसच्या (corona virus) साथीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. आज त्यांनी सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंद्वारे (video confrance) संवाद साधला. यात महाराष्ट्र, (maharashtra) तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिसा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. (To stop crowding draw policy cm thckeray urges pm modi dmp82)

हेही वाचा: लॉकडाऊन जीवावर बेतला; विरारच्या हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

हेही वाचा: तिकीटावरून सापडला खूनी; ३६ तासात वसई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली.

loading image