esakal | Coronavirus : तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारची लपवाछपवी करत नाही : मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

Today CM Uddhav Balasaheb Thackeray address the State

मुंबई : एप्रिल महिन्याअखेर, मे महिन्यापर्यंत किती रुग्ण होतील, याविषयी आकडे फिरत आहेत. देशात, महाराष्ट्र, मुंबईत किती रुग्ण होतील, याचे आकडे पसरवले जात आहे. मुंबईत काय चाललं आहे? चाचण्या कमी केल्यात का? लपवाछपवी सुरू आहे का? असं बोललं जात आहे. काहीही लपवलेलं नाही. अजिबात नाही. लपवण्यासारखं काही नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

Coronavirus : तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारची लपवाछपवी करत नाही : मुख्यमंत्री

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : एप्रिल महिन्याअखेर, मे महिन्यापर्यंत किती रुग्ण होतील, याविषयी आकडे फिरत आहेत. देशात, महाराष्ट्र, मुंबईत किती रुग्ण होतील, याचे आकडे पसरवले जात आहे. मुंबईत काय चाललं आहे? चाचण्या कमी केल्यात का? लपवाछपवी सुरू आहे का? असं बोललं जात आहे. काहीही लपवलेलं नाही. अजिबात नाही. लपवण्यासारखं काही नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्राचं पथक पाच-सहा दिवसांपासून आपल्याकडं मुक्काम ठोकून आहे. हे पथक आल्यानंतर काहीजणांनी मला सांगितलं. बघा, केंद्राचं पथक आलेलं आहे. दाल में कुछ काला हो सकता है? मी त्यांना सांगितलं की, आम्ही त्यांच्याकडूनच डाळ मागतोय. कारण अजूनही अन्न सुरक्षा योजनेतंर्गत धान्य वाटायचं आहे. त्यात फक्त तांदूळ आहे. गहू आणि डाळ हवी आहे. दाल में काला बाद में, पहले दाल तो आने दो. डाळ आल्यानंतर त्याच्यामध्ये काळंबेर आहे की नाही, ते नंतर बघू, पण आधी डाळ आली पाहिजे, गहू आला पाहिजे, असं म्हणत ठाकरे यांनी सरकारच्या कामावर संशय घेणाऱ्यांना उत्तर दिलं.

राज्यात कोरोनाच्या विषाणूमुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, कोरोनासंदर्भात निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरल्याची तसेच रेशनच्या धान्य वाटपावरून सरकारवर टीका होत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर दिले.

Coronavirus : दिलासादायक ! २४ तासात वाढले फक्त ०६ टक्के रुग्ण; १४ मार्चनंतर सर्वात कमी वृद्धीदर

मुख्यमंत्री म्हणाले, 'महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी लॉकडाउनमुळं गुणाकारात वाढणाऱ्या या संकटावर मात करण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत. आरोग्य कर्मचारी, पोलीस अशा कोणावरही पटकन संशय व्यक्त करण्याआधी त्यांच्या परिस्थितीचा विचार करा. सध्या हे लोक खूपच तणावाखाली काम करीत आहेत.

loading image