भुजबळांच्या जामिनावर आज निकाल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात आरोपी असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज उच्च न्यायालयात पूर्ण झाली. या अर्जावर न्यायालय शुक्रवारी (ता. 4) निकाल देणार आहे. भुजबळ यांनी प्रकृति अस्वास्थ्याच्या कारणावरून जामिनासाठी अर्ज केला आहे. मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्याचे कलम 45 अ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयाचा आधार घेऊन जामीन मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सध्या माझे वय 71 असून, मला विविध आजार आहेत. दोन वर्षांपासून मी तुरुंगात आहे.

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात आरोपी असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज उच्च न्यायालयात पूर्ण झाली. या अर्जावर न्यायालय शुक्रवारी (ता. 4) निकाल देणार आहे. भुजबळ यांनी प्रकृति अस्वास्थ्याच्या कारणावरून जामिनासाठी अर्ज केला आहे. मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्याचे कलम 45 अ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयाचा आधार घेऊन जामीन मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सध्या माझे वय 71 असून, मला विविध आजार आहेत. दोन वर्षांपासून मी तुरुंगात आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

Web Title: Today the result of Bhujbal bail