लातूर, चंद्रपूर, परभणीत आज मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 एप्रिल 2017

पुणे - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी उद्या बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. मतमोजणी 21 एप्रिल रोजी होणार आहे. उन्हाची वाढती तीव्रता पाहता मतदारांच्या सोयीसाठी या तिन्ही ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी 6.30 पर्यंत वाढवण्यात आली आहे. लातूरला 70, परभणीत 65, तर चंद्रपूरमध्ये 66 जागांसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी अनुक्रमे 401,418 आणि 460 उमेदवार रिंगणात आहेत.

चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकांच्या निवडणुकांसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ ठरली होती; परंतु उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन वेळ वाढविण्याची मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती. त्यानुसार एक तास वेळ वाढविण्यात आली आहे. अकोला जिल्हा परिषदेचा दानापूर निवडणूक विभाग आणि अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा गणाच्या रिक्त पदासाठीही बुधवारी पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी वाढत्या उष्म्यामुळे सायंकाळी 6.30 पर्यंत मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे, असे सहारिया यांनी सांगितले.

Web Title: today voting in latur, chandrapur, parbhani