पुस्तकांच्या गावाचे आज उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध, असलेले भिलार हे गाव देशातले पहिले पुस्तकाचे गाव म्हणून साकारत असून, या "पुस्तकाच्या गावाचे' उद्या, चार मे रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्‍यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून रूपांतरित होत आहे. सुमारे 15 हजारांहून अधिक पुस्तकांचा खजिना या पुस्तकाच्या गावात उपलब्ध असून, त्यात कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, स्त्री साहित्य, संतसाहित्य, चरित्र आदी विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलार गावातील श्रीजननीमाता मंदिर परिसरात उद्‌घाटनाचा कार्यक्रम होईल. 

या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती रूपाली राजपुरे, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Today's inauguration of the village of books