महाराष्ट्रातून १७१ अब्ज केंद्राच्या तिजोरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Money
महाराष्ट्रातून १७१ अब्ज केंद्राच्या तिजोरीत

महाराष्ट्रातून १७१ अब्ज केंद्राच्या तिजोरीत

पुणे - कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी स्टॅप ड्यूटी (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्कातून (Registration Fee) मिळालेले उत्पन्न (Income) मोठे दिलासादायक ठरले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत स्टॅप ड्यूटी व नोंदणी शुल्कातून १००१ अब्ज सरकारच्या तिजोरीत (Government Treasury) जमा झाले आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे १७१ अब्ज राज्यातून जमा झाले आहेत.

ही आकडेवारी देशातील २८ राज्यांची आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (एमओएफएसएल) ने केलेल्या एका अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यात आर्थिक वर्ष २०२१-२२ एप्रिल-नोव्हेंबर या आठ महिन्यांचा उत्पन्नाचा आढावा घेण्यात आला आहे. यातील एकूण संकलनापैकी १७.१ टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकमधून अनुक्रमे १२८ अब्ज, ८७ अब्ज आणि ८४ अब्ज शुल्क जमा झाले आहे.

हेही वाचा: राज्यात आजअखेर ८६१ लाख टन उसाचे गाळप

एमओएफएसएल अभ्यासानुसार, तेलंगण, सिक्कीम आणि जम्मू आणि काश्मीर ही एकमेव राज्ये आहेत, ज्यांचे आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या आठ महिन्यांचे महसूल संकलन हे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जमा झालेल्या महसूल संकलनापेक्षा जास्त आहे.

निवासी रिअल इस्टेट क्षेत्राने या आर्थिक वर्षांपासून जोरदार पुनरागमन केले आहे. तर आता देखील चांगली कामगिरी करत आहे. ही कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली आहे. आम्हाला आशा आहे की, सरकार आगामी अर्थसंकल्पात या क्षेत्राला काही प्रोत्साहन देईल. अर्थव्यवस्थेशी त्याचे मोठे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड संबंध आहेत. ही बाब लक्षात घेता त्यात जीडीपी वाढीला भरीव वाढ करण्याची क्षमता आहे.

- निखिल गुप्ता, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस

हेही वाचा: Video : प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याचं नेहरुंच्या हस्ते झालं होतं अनावरण

राज्य - आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या आठ महिन्यांत जमा झालेले स्टॅप ड्यूटी व नोंदणी शुल्क (दशलक्षांत)

 • महाराष्ट्र -१,७०,९६९

 • उत्तर प्रदेश - १,२७,८५६

 • तमिळनाडू -८६,६९८

 • कर्नाटक - ८३,७२२

 • तेलंगण - ७०,२८२

 • गुजरात - ६४,७११

 • हरियाना - ४९,८९०

 • मध्य प्रदेश - ४६,५७०

 • पश्चिम बंगाल - ४६,४९२

 • आंध्र प्रदेश - ४६,२९८

 • राजस्थान - ३९,२५४

 • बिहार - ३०,०४४

 • केरळ - २७,३४२

 • पंजाब - २०,८९७

 • ओडिशा - १७,१९२

 • छत्तीसगड - १०,३२३

 • उत्तराखंड - ९,१९०

 • झारखंड - ६,०१७

 • जे के - ३,३१३

 • हिमाचल प्रदेश - १,९२९

 • आसाम - १,२००

 • त्रिपुरा - ५३४

 • सिक्कीम - १५५

 • मेघालय - १४९

 • अरुणाचल प्रदेश - ७०

 • मणिपूर - ४६

 • मिझोराम - ३३

 • नागालँड - २३

 • एकूण - १०,०१,२४६

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top