रायगडमध्ये बाधित रुग्णसंख्येचा १० हजारांचा टप्पा पार
अलिबाग : १५ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात (Raigad) एक हजारापर्यंत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येत (corona patients) झपाट्याने वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात १० हजार २७३ सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढताना दिसतो. आठवडाभरात दरदिवसाला सरासरी दीड हजार रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सर्वांत जास्त रुग्णसंख्या पनवेल (panvel) पालिका क्षेत्रात आहे; तर तळा, म्हसळा, माणगाव, सुधागड या तालुक्यांमध्ये अत्यल्प रुग्णसंख्या आहे; मात्र जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या उपाययोजनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. (more than ten thousand corona patients found in raigad district)
नववीपर्यंतच्या शाळा बंद झाल्या आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्बंधांमुळे येथील कमी रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. साथ आटोक्यात यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत; परंतु रुग्णसंख्या कमी होत असल्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मागील १५ दिवसांत कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.४७ वरून २५ टक्क्यांवर पोहचला.
कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याने त्रिसूत्रीचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याने नागरिकांनी कोरोनामुळे घाबरून जाऊ नये. सध्याचे वातावरणही योग्य नसल्याने लक्षणे दिसणाऱ्यांनी तात्काळ तपासणी करणे आवश्यक आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
तालुक्यातील रुग्णसंख्या पनवेल पालिका- ७१६० पनवेल ग्रामीण- ११९३ उरण- ११६ खालापूर- २८२ कर्जत- २१६ पेण- ३३३ अलिबाग- ४६७ मुरुड- १६ माणगाव- १४८ तळा- ७ रोहा- १०१ सुधागड- ९ श्रीवर्धन- २८ म्हसळा- १२ महाड- १७६ पोलादपूर- ९ एकूण- १०२७३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.