साकिनाक्यात पादचाऱ्याला लुटलं; काही तासांतच तीन चोरटे गजाआड| Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold robbery
साकिनाक्यात पादचाऱ्याला लुटलं; पोलिसांनी तीन चोरट्यांना ठोकल्या बेड्या

साकिनाक्यात पादचाऱ्याला लुटलं; काही तासांतच तीन चोरटे गजाआड

मुंबई : साकिनाक्यातील (sakinaka robbery) स्वप्नील खिंदवीकर या २४ वर्षीय तरुणाला चोरट्यांनी लुटल्याची घटना नुकतीच घडलीय. चोरट्यांनी तरुणाची सोन्याची साखळी (gold chain) आणि मोबाईल (mobile) फोन लंपास केला होता. याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी काही तासांतच चोरट्यांना पकडून गजाआड केले आहे. गोवंडीतील सीसीटीव्ही फुटेजच्या (cctv footage) माध्यमातून या तीन चोरट्यांचा सुगावा लागला आणि नाहर अम्रित शक्ती रोडवर त्यांना पोलिसांनी पकडलं. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियांनं दिलं आहे. (Three culprit arrested by mumbai police in sakinaka robbery crime)

हेही वाचा: विक्रमगड : आश्रम शाळेतील 13 विद्यार्थ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

याबाबत सविस्तर वृत्त असं की, स्वप्नील पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास घरी जायला निघाला होता. त्यावेळी चोरट्यांनी त्याच्याकडे असलेल्या किंमती वस्तू चोरल्या. " नाईट शिफ्ट संपल्यावर स्वप्नील त्याच्या घरी जायला निघाला होता. त्यावेळी चोरट्यांनी त्याला लुटलं. यानंतर काही तासांतच साकिनाका पोलिसांनी या चोरीच्या घटनेचा छडा लावत चोरट्यांना पकडले आणि त्यांच्याजवळील चोरीचा माल जमा केला. अशी माहिती पोलीस उप आयुक्त (zone x) महेश्वर रेड्डी यांनी दिलीय.

"आरोपींचा यापूर्वीचाही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. स्वप्नीलला चोरट्यांनी धमकावले त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणारा किमती ऐवज लंपास केला. टेक्नीकल पुराव्यांमुळे चोरांची ओळखण्यास आणि पकडण्यात मदत झाली. असं साकिनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत देशमुख यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime update
loading image
go to top