Pankaja Munde: पंकजा मुंडे- एकनाथ खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा! प्रतिक्रिया देताना मात्र म्हणाले, 'राजकीय...'

एकनाथ खडसे यांनी आज पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा केली
Pankaja Munde
Pankaja MundeEsakal

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. अनेक नेत्यांच्या नाराजी, मतभेद, मनभेद दिसून येत आहेत. अशातच भाजपच्या कायम चर्चेत असणाऱ्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. त्यानंतर पंकजा यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात रंगली. त्यावर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.(Latest Marathi News)

अशातच आज राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली आहे.(Latest Marathi News)

Pankaja Munde
Maharashtra Politics: राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा, राष्ट्रवादीचा नेता बीआरएसच्या वाटेवर?

दरम्यान यावेळी अनेक राजकीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी गोपीनाथ गडावर आल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. तर पंकजा मुंडे यांना यावर बोलताना म्हणाले आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आजच्या दिवशी मला शून्य राजकारण दिसतं. मी कोणत्याही राजकीय नेत्याला बोलावलं नाही. इथं आलेला प्रत्येक जण मुंडे साहेबांच्या प्रेमासाठी आला आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात यावेळी त्यांनी भेटवर आणि झालेल्या चर्चेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.(Latest Marathi News)

Pankaja Munde
Uddhav Thackrey: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर CM शिंदेंचा ठाकरेंना धक्का! दोन शिलेदारांनी सोडली साथ

तर या भेटीवर बोलताना एकनाथ खडसे यांनी बोलताना आजच्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. तर गेल्या काही दिवसांपासुन पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com