नोटबंदी विरोधात उद्या 'आरबीआय'ला कॉंग्रेसचा घेराव

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जानेवारी 2017

देशभरातल्या शाखांवर आंदोलन, 29 ला मुंबईत मेळावा
मुंबई - नोटबंदीचा निर्णय हुकूमशाही पद्धतीचा असून, यामुळे जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत, असा आरोप करीत या निर्णयाच्या विरोधात बुधवारी (ता. 18) कॉंग्रेस रिझर्व्ह बॅंकेला घेराव घालणार आहे. कॉंग्रेसच्या नोटबंदी विरोधी समितीचे प्रमुख सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

कॉंग्रेस मुख्यालय टिळक भवनमध्ये आज कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यात नोटबंदी विरोधात आक्रमक रणनीती आखण्यात आली. रिझर्व्ह बॅंकेच्या मुंबईतल्या मुख्यालयाला व नागपूर येथील शाखेला बुधवारी कॉंग्रेस कार्यकर्ते घेराव घालणार आहेत. देशभरातल्या 33 शाखांवर हे आंदोलन होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

नोटबंदीच्या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले, की नोटाबंदीमुळे जनता त्रस्त आहे. कॉंग्रेस जनतेसोबत असून या हुकूमशाही निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस लढा देत आहे. देशात पहिल्यांदाच रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता संपुष्टात आल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर हे संकट असल्याची भीती त्यांनी व्यक्‍त केली. घेराव आंदोलनानंतर 29 जानेवारी रोजी मुंबई नोटबंदीविरोधात कॉंग्रेसचा मेळावादेखील आयोजित केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: tomorrow against currency ban RBI Congress enclosures