तूरडाळ ३५ रुपयेच

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मुंबई - ""रास्तभाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळींच्या पाकिटांवर 55 रुपये प्रतिकिलो असा दर छापलेला असला, तरी या तूरडाळीच्या पाकिटांवर 35 रुपये प्रतिकिलो असे "स्टिकर' लावून सर्व शिधापत्रिकाधारकांना विक्री करण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून, तशा सूचना रास्तभाव दुकानदारांना देण्यात आल्या आहेत,'' अशी माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक यांनी दिली आहे. 

अधिकृत शिधावाटप दुकानात तूरडाळ 35 रुपये प्रति किलो या दरानेच विक्री करण्याबाबत निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. तूरडाळीतील गैरव्यवहाराची बरणी नुकतीच "सकाळ'ने फोडली होती. लाभार्थींना तूरडाळ न मिळता, तिची खुल्या बाजारात विक्री होत असल्याचे त्यात दिसून आले होते. तसेच सरकारने ठरविल्यापेक्षा जास्त दराने डाळींची विक्री होत असल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा तूरडाळ रेशन दुकानांतून 35 रुपयांनीच विकण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

अधिकृत शिधावाटप दुकानांतून ई- पॉस मशिनद्वारे धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणून कोणताही लाभार्थी अन्नधान्यपासून वंचित राहणार नाही व अन्नधान्याची जादा दराने विक्री केली जाणार नाही. तसेच शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नसांची विक्री केल्यानंतर पावती देण्याबाबत सूचना अधिकृत शिधावाटप दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत. जे अधिकृत शिधावाटप दुकानदार या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे निर्देश शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालकांनी दिले आहेत. शिधावाटप दुकानदाराने तांदूळ, गहू, केरोसीन ई- शिधा जिन्नसांचे ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करताना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

पात्र लाभार्थींना तीन रुपये प्रति किलो याप्रमाणे प्रति व्यक्ती दोन किलो तांदूळ व रुपये दोन प्रति किलो याप्रमाणे प्रति व्यक्ती तीन किलो गहू वितरण करण्यात येत आहेत. 

150000 क्विंटल - दरमहा वितरित होणारी सरासरी तूर 
1,57,79,327 - एकूण कार्डधारक 

Web Title: Toordal 35 rupees only