''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

Torrent Power Project Karjat : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत वृक्षतोडीबाबत पसरवल्या जाणाऱ्या आरोपांना ‘फेक नॅरेटिव्ह’ असं म्हटलं आहे. हा प्रकल्प प्रदूषण कमी करणारी स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Torrent Power Project Karjat

Torrent Power Project Karjat

esakal

Updated on: 

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वनजमीन वापरली जाणार असल्याने वृक्षतोड आणि जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत वृक्षतोडीबाबत पसरवल्या जाणाऱ्या आरोपांना ‘फेक नॅरेटिव्ह’ असं म्हटलं आहे. हा प्रकल्प प्रदूषण कमी करणारी स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com