Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

Ganeshpur Tractor Accident : गणेशपूर येथील हृदयद्रावक अपघात: ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळली, एक चिमुकली वाचली तर दोन अद्याप बेपत्ता. गावकऱ्यांनी आणि पोलीस पथकाने रात्रभर शोधकार्य चालवले.
Tractor fell into well with children, one rescued, ongoing search for missing girls

Tractor fell into well with children, one rescued, ongoing search for missing girls

Sakal

Updated on

साक्री : गणेशपुर ता.साक्री येथे कांदे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली सह विहिरीत कोसळले. ट्रॅक्टर वर खेळत असलेले तीन बालिका देखील विहिरीत पडल्या. त्यापैकी एका बालिकेला वाचवण्यात यश आले असून दोन बालीकांना शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com