Traffic Jam : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे'वर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या दीड किमीपर्यंत रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai pune expressway traffic

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एक ते दीड किमीपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहनधारांना त्रास सहन करावा लागत आहे.

Traffic Jam : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे'वर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या दीड किमीपर्यंत रांगा

Traffic jam on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडं जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून वाहतूक ठप्प झाली आहे.

पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळं मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ पहायला मिळत आहे, असं वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) सांगितलं.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एक ते दीड किमीपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहनधारांना त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासून या मार्गावर अशीच परिस्थिती आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. या कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचं काम वाहतूक पोलीस करत आहेत.