वाहतूक पोलिस भ्रष्टाचार करीत नसल्याचा अहवाल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - नियम धुडकावणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिस पैसे उकळत असल्याचे अथवा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करीत असल्याचे पोलिस तपासात सिद्ध होत नाही, असा स्पष्ट दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. विशेष म्हणजे, मुख्य हवालदारांनीच वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराबाबत न्यायालयात केलेल्या तक्रारीत अशी "क्‍लीन चिट' देण्यात आली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने न्या. रणजित मोरे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल दाखल करण्यात आला. तक्रारदार सुनील टोके यांनी मुंबई व पुण्यातील वाहतूक पोलिसांविरोधात याचिका दाखल केली आहे. यात काही पोलिसांविरोधात नावांसह भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असून, सोबत सीडीही आहेत. मात्र टोके यांनी याचिकेत केलेले आरोप चुकीचे आहेत. तपासात याबाबत काहीही तथ्य आढळले नाही, असे "एसीबी'च्या वतीने ऍड. जे. पी. याज्ञिक यांनी खंडपीठाला सांगितले. या अहवालानुसार 29 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. काही अधिकाऱ्यांचाही जबाब घेण्यात आला आहे. याचिकादार टोके यांनी दिलेल्या सीडींच्या अनुषंगानेही तपास करण्यात आला. यातील दृश्‍ये "यू-ट्यूब' व वृत्तवाहिन्यांवरील असून, ती अहमदाबादमधील आहेत. याचिकादाराने दिलेल्या सीडींमधील आवाजही स्पष्ट नाही. यातील काही व्हिडिओ "यू-ट्यूब'वरून घेतले असल्याचेही याचिकादाराने मान्य केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. 

याचिकादारांचे वकील प्रदीप हावनूर यांनी या सीडी पाहाव्यात आणि न्यायालयात छायाचित्रांसह माहिती द्यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी 29 मार्चला आहे. टोके यांनी दाखल केलेल्या याचिकेत बेकायदा वाहनतळासह सर्व प्रकारचे नियम धुडकावणाऱ्यांकडून पोलिसांनी पैसे उकळल्याचे आरोप केले आहेत. 

Web Title: Traffic police do not report corruption