
Beed Crime Marathi News : एचआयव्हीमुळं मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्यानं गावानं वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. ही अफवा आरोग्य विभागातील अधिकारी आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे. याबाबत या कुटुंबानं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडं तक्रार केली आहे. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.