
Fake Customer Care No Marathi News: ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज कुठल्यातरी वेगळ्या मार्गानं लोकांना गंडे घालण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच आता एक नाव फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार इंटरनेटवरुन कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर कॉल करणं एका डॉक्टर महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. या महिलेच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी थेट 13.75 लाख रुपये गायब केले आहेत.