esakal | मराठा, कुणबी विद्यार्थ्यांनी 'सारथी'चा लाभ घेण्याचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Sarathi

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांनी 'सारथी'चा लाभ घेण्याचं आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्यसेवा अराजपत्रित संयुक्त (गट- ब) पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी ‘सारथी’ (sarthi) मार्फत आयोजित प्रशिक्षणाचा मराठा (maratha) आणि कुणबी (kunbi) विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थचे (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. (Training by Sarathi for competitive exams)

‘सारथी’ने उपलब्ध करून दिलेल्या निःशुल्क प्रशिक्षणाच्या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे. प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२१ आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

‘सारथी’मार्फत मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित) गट - ब (पीएसआय, एसटीआय) पदांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केले आहे. याबाबत ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात केली आहे.

हेही वाचा: शिवसेना खासदार गवळीप्रकरणात सीएंच्या तक्रारीवर काय कारवाई केली?

या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ‘सारथी’ने अर्ज मागविले आहेत. यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्र उमेदवारांना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची निवड ही कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे करण्यात येईल, असे काकडे यांनी सांगितले.

loading image
go to top