

MSRTC Adds 1150 Buses for Pandharpur Kartiki Yatra
ESakal
मुंबई : पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा पार पडणार असून त्यानिमित्त विठुरायाचे भक्त आतापासूनच पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. कार्तिकी एकादशी यात्रेसाठी अनेक वाऱ्या निघाल्या असून या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता विठुरायाच्या भक्तांच्या सेवेसाठी एसटी प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे.