सावित्रीच्या लेकींना बॅंकेकडून  सावत्र लेकीची वागणूक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

जिल्ह्यातील उर्वरित बॅंकेच्या सभासद असलेल्या महिला शिक्षिकांना बॅंकेने सावत्रपणाची वागणूक दिली, असा आरोप शिक्षक परिषद गुरुमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षी तांबे यांनी केला. 

 

नगर,  : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेने शताब्दी वर्षानिमित्त जिल्हाभरातील साडेचार हजार महिला शिक्षिकांपैकी एका तालुक्‍यातील 10 शिक्षिका याप्रमाणे 140 महिलांना क्रांतिज्योती सावित्रीच्या लेकी पुरस्काराने गौरविले. त्यास आमचा विरोध नाही. परंतु जिल्ह्यात साडेचार हजार महिला शिक्षिकांपैकी 140 महिला शिक्षिका निवडताना कोणते निकष लावण्यात आले.

जिल्ह्यातील उर्वरित बॅंकेच्या सभासद असलेल्या महिला शिक्षिकांना बॅंकेने सावत्रपणाची वागणूक दिली, असा आरोप शिक्षक परिषद गुरुमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षी तांबे यांनी केला. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पुरस्कार जर शिक्षक बॅंकेने दिले होते व पुरस्कारासाठी बॅंकेचे सभासदत्व हाच एकमेव निकष होता, तर मग महिला शिक्षिकाही शिक्षक बॅंकेच्याच सभासद होत्या. त्यातील काहींनी मतदानही केले आहे. मग त्यांना डावलताना त्या काय बॅंकेच्या सावत्र लेकी होत्या काय? असा सवाल तांबे यांनी निवेदनाद्वारे केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment of women by the teacher bank