Maharashtra Rain: रायगडात पावसाचे थैमान! झाड कोसळले, विजेच्या तारा तुटल्या, वाहतूक ठप्प
Monsoon Update: काल सायंकाळपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून झाड आणि विजेच्या तारा कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
हिर्डोशी : भोर महाड रस्त्यावरील आपटी (ता .भोर) येथे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खोदकाम केलेल्या मोरीच्या ठिकाणी सोमवारी (ता .१६) सकाळी झाड रस्त्यावर पडले आहे. या पडलेल्या झाडामुळे रस्त्या शेजारील विजेच्या ताराही तुटल्या आहेत.