रेल्वेच्या जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी सामंजस्य करार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी रेल्वे लाइन्सच्या शेजारी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात राज्य शासन आणि रेल्वे विभाग यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुंबई - राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी रेल्वे लाइन्सच्या शेजारी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात राज्य शासन आणि रेल्वे विभाग यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

गेल्या वर्षी 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी 83 लक्ष इतकी विक्रमी वृक्ष लागवड वन विभागाने केली होती. राज्यातील वनक्षेत्र 20 टक्‍क्‍यांवरून 33 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन आणि वनेतर क्षेत्राची गरज आहे. ही गरज लक्षात घेता राज्यातील रेल्वे लाइन्सच्या बाजूला उपलब्ध असलेले क्षेत्र हरित करण्याची संकल्पना मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर मांडली. रेल्वे विभागाची जमीन वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध व्हावी, यासाठी मे 2015 पासून त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला. 15 जून 2016 रोजी नवी दिल्लीत यासंदर्भात त्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या पार्श्‍वभूमीवर 19 एप्रिल रोजी हा सामंजस्य करार तयार झाला. रेल्वे विभाग आणि वन विभाग यांच्यात झालेल्या या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील रेल्वेचे मोठे क्षेत्र वनीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी वृक्ष लागवडीनंतर या वर्षीसुद्धा 1 जुलै रोजी 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्यसरकारने केला आहे.

Web Title: tree plantation agreement for railway place