‘समृद्धी’वर हिरवाई

‘समृद्धी’वर हिरवाई

मुंबई -  महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड व त्यामुळे निसर्गाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निश्‍चित असे धोरण आखले आहे. प्रस्तावित महामार्गादरम्यान आठ लाख झाडांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. या कामासाठी लखनौ येथील राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्थेचे (एनबीआरआय) मार्गदर्शन घेतले जाणार आहे. 

महाराष्ट्र समृद्धी महामार्गादरम्यान काही ठिकाणी वृक्षतोड होणे अपरिहार्य आहे. परंतु, तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात नव्याने वृक्षलागवड करण्यासंदर्भात एमएसआरडीसीने धोरण आखले आहे. एका किलोमीटरमागे किमान १३२६ झाडे लावण्यात येणार आहेत. ७०१ पैकी ६०० किमी मार्गावर अशा प्रकारे सुमारे आठ लाख झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच, प्रस्तावित महामार्गादरम्यान इंटरचेंज, रेस्ट एरिया, वेसाइड ॲमेनिटीज अंतर्गत येणाऱ्या भूभागावरील पट्ट्यातही वृक्षांची लागवड केली जाणार आहे. लखनौ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेने (एनबीआरआय) या कामी महामंडळाला मार्गदर्शन करण्याची तयारी  दर्शवली आहे. 

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांतून जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची माती, हवा, पाणी, पर्जन्य प्रमाण, हवामानाची स्थिती या सगळ्यांचा अभ्यास करून महामार्गाच्या दुतर्फा नेमकी कोणती झाडे लावली जावीत, याचा अभ्यास राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था करणार आहे. संस्थेने केलेल्या शिफारशींनुसार रोपवाटिका विकसित केली जाणार असून, त्यानंतर महामार्गाच्या दुतर्फा संस्थेने सुचवलेलीच झाडे लावली जातील, याची खबरदारी एमएसआरडीसी  घेणार आहे.

महामार्गाच्या उभारणीदरम्यान अधिकाधिक वृक्षलागवड करण्यास कटिबद्ध आहोत. भारतीय रस्ते परिषदेच्या नियमांत महामार्गादरम्यान प्रतिकिलोमीटर ५८३ झाडे लावावीत, असे नमूद आहे. परंतु, आम्ही त्यापेक्षा किती तरी अधिक झाडांची लागवड करणार आहोत. 
- राधेश्‍याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक आणि रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष

काय आहे एनबीआरआय?
यापूर्वी नॅशनल बोटॅनिक गार्डन्स (एनबीजी) असे नामकरण असलेली राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्था (एनबीआरआय) ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या दिल्लीस्थित संस्थेच्या अधिपत्याखाली येते. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्याबरोबरच विविध प्रकारच्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींचे जतन करून वृद्धीसाठी प्रयत्न करणे, वनस्पतींसंदर्भात तंत्रवैज्ञानिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे, ही राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्थेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com