मुंबई - सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी हा त्याच संवर्गासाठी खर्च करण्याची तरतूद असताना राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी ७६४ कोटी रुपयांचा निधी वळविण्यात आला आहे.
हा निधी याच संवर्गातील महिलांना लाडकी बहिण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र किती आदिवासी आणि दलित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, हे राज्य सरकारने हा निधी वळविताना स्पष्ट केलेले नाही.