आदिवासी विद्यार्थी ठरले ‘एव्हरेस्टवीर’

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - जगातील गिर्यारोहकांना भुरळ घालणारा माऊंट एव्हरेस्ट सर करण्यात मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे या आदिवासी विद्यार्थ्यांना यश आले आहे. दोघांनी पहाटे ३.१५ आणि अन्य दोघांनी ४.१५ वाजता हे शिखर सर केले.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूर, जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांमधील उपजतच असलेल्या धाडसीपणाला साद घालत ‘मिशन शौर्य’ची स्थापना केली. प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळावेगळा उपक्रम पहिल्यांदाच या विभागातर्फे राबविण्यात आला होता. त्यानुसार मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया आत्राम हे सर्व जण या मिशनसाठी निघाले.

जुलै २०१७ पासून या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले होते. दार्जिलिंग, लेह, लडाख या ठिकाणी त्यांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. ११ एप्रिलला विद्यार्थी मुंबईहून काठमांडूला रवाना झाले. मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी कर्मचारी, व्यवस्थापक यांच्यासह तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथकही रवाना झाले होते. मोहिमेतील इतर जणही मोहीम फत्ते करतील, असा विश्‍वास आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी व्यक्‍त केला.

Web Title: Tribal Student Everester mount everest Success Motivation