
Summary
त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांनी दरवाजा बंद झाल्यावर लाथा मारत गोंधळ घातला.
सुरुवातीला व्हायरल व्हिडिओमुळे मंदिर सुरक्षा रक्षकांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला.
मंदिर प्रशासनाने खरा व्हिडिओ जाहीर केला आणि गैरसमज दूर झाला; भाविकाला माफी मागून सोडण्यात आले.
Trimbakeshwar Devotees Chaos video : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिन्यात दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांनी जोरदार गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्याने काही भाविकांनी दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला. पोलिस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी गोंधळ घालणाऱ्या भाविकांना चोप दिला आहे.