
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्काबाबत राबविलेल्या जशास तसे धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसू लागले असून भारतासह युरोप आणि आशियायी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. व्यापार युद्धाची भीती आणि दाटून आलेले मंदीचे ढग यामुळे भारतीय शेअर बाजार आज तीन टक्क्यांच्या आसपास कोसळले. सेन्सेक्स २ हजार २२६.७९ अंश तर निफ्टी ७४२.८५ अंशांपर्यंत घसरला.