

Tukaram Mundhe Action Mode
ESakal
मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या वर्षभरात अन्न नमुने तपासण्याच्या प्रमाणात चारपटीहून अधिक वाढ नोंदविल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मनुष्यबळाचा योग्य वापर, प्रयोगशाळेतील उपकरणांचा बॅचनुसार वापर, कामकाजाच्या दोन पाळ्यांमध्ये काम, प्राधान्यानुसार नमुन्यांचे वर्गीकरण, तसेच दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत खाद्यपदार्थ व प्रतिबंधित पदार्थ यांच्या तपासणीला गती, अशा उपाययोजनांमुळे नमुना तपासणीत ही वाढ साध्य झाल्याचे विभागाने म्हटले आहे.