Which Pakistani cosmetics were seized by FDA?
esakal
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत पाकिस्ताननिर्मित सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना तयार केलेली आयुर्वेदिक औषधे, दिशाभूल करणारे दावे करणारी सौंदर्यप्रसाधने आणि रुग्णालयांशी संलग्न औषधांच्या दुकानांतील गंभीर अनियमिततांवर मोठी कारवाई (FDA Maharashtra illegal cosmetics raid) केली. ८ ते १० जुलैदरम्यान नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे छापासत्र राबवून सुमारे ९० लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित साठा जप्त करण्यात आला.