

Tukaram Mundhe Orders Major Action
esakal
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक कारवाई सुरू केलीय. आयएएस तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धडक मोहीम भेसळखोरांविरोधात उघडण्यात आलीय. गेल्या सहा दिवसांत राज्यात २०३ ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. या मोहिमेत आतापर्यंत सुमारे एक कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा प्रतिबंधित व भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय. तर १०२ जणांना अटक करण्यात आली आहे. ६८ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने २५ मे ते ३१ मे या कालावधीत राज्यभर 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' मोहीम सुरू आहे. Mundhe's Food Safety Drive Shuts 68 Shops and Hotels