

Tukaram Mundhe Water Inspection Quality
esakal
Maharashtra FDA : राज्यात जारमधून पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) थेट नियंत्रण नसल्याची बाब विधानसभेत समोर आली आहे. उघड्या जारमधील पाणी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत 'अन्न'च्या व्याख्येत येत नसल्याने त्याची तपासणी करता येत नसल्याची माहिती सरकारने दिली. या पार्श्वभूमीवर जार व इतर माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात आल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.