Tukaram Mundhe: तडकाफडकी बदलीनंतर तुकाराम मुंढेंचं ट्विट चर्चेत

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe
Tukaram Mundheesakal

Tukaram Mundhe: कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडील आरोग्य विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुंढे यांनी आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, पुढील नियुक्तीसाठी त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले.

मात्र बदली होताच तुकाराम मुंढे यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटची चर्चा आता रंगू लागली आहे. मुंडे यांनी इंग्रजीत ट्विट केलं आहे त्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "आयुष्यात नेहमीच तुमच्या अपेक्षेप्रमाणं, त्या मार्गानं घटना घडत नसतात", गेल्या वर्षी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली झाली होती.

तेथून राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी बदली झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकपदाचा कारभार मुंढे यांनी हाती घेतला होता; मात्र दोन महिन्यातच राज्य सरकारने त्यांचा कार्यभार काढून घेतला. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षात 19 वेळा बदली करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com