दागिने गैरव्यवहाराचा तपास सीआयडीकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

गरज भासल्यास महाराष्ट्र पोलिसाची सुरक्षा
राज्यातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळांवरील चोऱ्या तसेच मौल्यवान मूर्ती व दागिने यांच्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांना सूचना दिल्या आहेत. देवस्थान ट्रस्टनी सुरक्षारक्षकांची मागणी केल्यास त्यांना महाराष्ट्र पोलिस दलामार्फत सुरक्षा दिली जाईल, असे केसरकर म्हणाले.

मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. 

तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍यातील वज्रेश्वरी देवीच्या दरोडाप्रकरणी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केसरकर म्हणाले, ‘‘तुळजाभवानी देवस्थानच्या खजिना गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली असून समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्‍यकता असल्यास या प्रकरणाची राज्य गुप्त वार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाईल.  

सहा जणांना अटक
भिवंडी तालुक्‍यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरावरील दरोडाप्रकरणी प्राप्त फिर्यादीवरून ठाणे पोलिस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी फरार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuljabhavani Jewellery Non behavioral Inquiry CID