मतदारसंख्येत 21 लाखांनी वाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते; तर आता 31 ऑगस्टपर्यंत 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 एवढी मतदार नोंदणी झाल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते; तर आता 31 ऑगस्टपर्यंत 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 एवढी मतदार नोंदणी झाल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. 

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले. मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी 4 कोटी 57 लाख 2 हजार 579 पुरुष मतदार व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारामध्ये दहा लाख 35 हजार 262 नव्या पुरुष मतदारांची वाढ होऊन ती 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 एवढी झाली; तर महिला मतदारांमध्ये 10 लाख 79 हजार 958 एवढी वाढ होऊन ती आता 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty one lakh increase in voter turnout