"सेट'साठी 27 हजार अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पुण - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या "राज्यस्तरीय पात्रता परीक्षे'साठी (सेट) 27 हजार 280 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत आहे. विद्यापीठाची सेट परीक्षा 28 जून रोजी होणार आहे. 

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा येथील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. आत्तापर्यंत 27 हजार 280 उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यातील 19 हजार 885 जणांनी शुल्क भरले आहे. ऑनलाइन अर्जासाठी आठवड्याची मुदत शिल्लक आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन विद्यापीठाच्या सेट विभागाने केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, यापूर्वीच्या परीक्षेत एक लाखापेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यातील पाच हजार 415 उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यापैकी चार हजार 624 उमेदवारांनी संकेतस्थळावरून ई-प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. 

ही काळजी घ्या 
ऑनलाइन अर्ज भरताना संवर्गाचा अचूक उल्लेख करावा. क्रिमिलेअर प्रमाणपत्र असेल, तर त्याच आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. उमेदवार सेट परीक्षेत पात्र ठरला असला, तरी त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच त्यांना उत्तीर्णाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty seven thousand applications for SEAT exam