प्राथमिक शाळांचे 20 हजार वर्ग रिकामे राहणार 

प्राथमिक शाळांचे 20 हजार वर्ग रिकामे राहणार 

सोलापूर - आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने आता 12 हजार पदांची शिक्षकभरती काढली. मात्र, "पवित्र पोर्टल'ला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे मागील तीन-चार महिन्यांपासून शिक्षकभरती खोळंबल्याने यंदा राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 20 हजार 412 वर्ग शिक्षकाविना रिकामेच राहणार असल्याचे चित्र दिसते. 

राज्यातील 37 टक्‍के शाळांमध्ये विज्ञान, गणित, भाषा आणि समाजशास्त्र या विषयाचे शिक्षकच नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, 31 मे रोजी अनेक शिक्षक निवृत्त झाले; तर 17 जूनपर्यंत अनेकांची आंतरजिल्हा होणार आहे. राज्यात सद्यःस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 20 हजार 412, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 22 हजार 997 जागा रिक्‍त असल्याची माहिती ही माहिती अधिकारात समोर आली आहे. रिक्‍त पदे आणि दर्जा वाढविण्याचे आव्हान असतानाच पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढत असल्याने अनेकांना अतिरिक्‍त होण्याची भीती वाटू लागली आहे. दरम्यान, "पवित्र पोर्टल'द्वारे होणाऱ्या शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळांचा पसंतीक्रम भरण्यासाठी लॉक पर्यायच उपलब्ध करून न दिल्याने शिक्षकभरती पुन्हा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे नव्या शिक्षकांना नियुक्‍ती कधीपर्यंत मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

राज्यातील प्राथमिक शाळांची स्थिती 
एकूण शाळा  - 87,780 
प्राथमिकची रिक्‍त पदे   -20,412 
माध्यमिक, उच्च माध्यमिकची रिक्‍त पदे  - 22,997 
शिक्षकभरती  - 12,001 

मुलांची संख्या कमी झाल्याने मागील तीन-चार वर्षांत जिल्ह्यातील 23 शाळा बंद कराव्या लागल्या. सद्यःस्थितीत प्राथमिक शिक्षकांच्या 310 जागा रिक्‍त असल्याने काही शिक्षकांकडे अतिरिक्‍त जबाबदारी द्यावी लागत आहे. नवीन शिक्षकभरती नाही आणि निवृत्त झालेल्या शिक्षकांची संख्या खूप असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 
- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com