मॉन्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

साधारणपणे २० मे रोजी येणारा मॉन्सून यंदा दोन दिवस आधीच शनिवारी अंदमानात दाखल झाला आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापत मॉन्सूनने हजेरी लावली आहे.

पुणे - साधारणपणे २० मे रोजी येणारा मॉन्सून यंदा दोन दिवस आधीच शनिवारी अंदमानात दाखल झाला आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापत मॉन्सूनने हजेरी लावली आहे.

मॉन्सून सोमवार (ता. २०) आणि मंगळवार (ता. २१) पर्यंत उत्तर अंदमानात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. तर, दरवर्षी साधारणपणे एक जूनपर्यंत येणारा मॉन्सून यंदा सहा जूनपर्यंत केरळात दाखल होईल, असा अंदाज यापूर्वीच हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीन ते चार दिवस कायम राहील. पुणे आणि परिसरात सोमवारपासून बुधवार पर्यंत उष्णतेची लाट जाणवेल.

मॉन्सून दाखल होण्याचा सर्वसाधारण कालावधी 
अंदमान-निकोबार : २० मे
केरळ : १ जून
तळ कोकण : ५ जून
महाराष्ट्र : १० जून
संपूर्ण भारत : १५ जुलै


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two days before the monsoon