बुलडाणा : हरविलेल्या तिघांपैकी दोन मुलांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

बुलडाणा : हरविलेल्या तिघांपैकी दोन मुलांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

बुलडाणा : घरून गायब झालेल्या तीन मुलांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र ही तीनही बालके खेळताना एका कारमध्ये गेली आणि दरवाजे लॉक झाले. परिणामी गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा शोध पोलिसांना रात्री 3 वाजता लागल्यानंतर पोलिसांची शोध मोहीम थांबली. 

घटनेबाबत सविस्त असे की, शहरातील गवळीपुरा भागातील 3 बालकांचे अपहरण झाल्याची तक्रार सोमवारी (ता. 15) बुलडाणा पोलिसात दाखल करण्यात आली होती. गवळीपुरा भागात राहणारे शेख हनीफ शेख हीरा यांचे दोन नातु व एक नात कु. सहर शेख हमीद (वय 4), शेख साहिल शेख जमील (वय 5) आणि शेख अजीज शेख समीर (वय 3) गावाच्या अंगणवाडी केंद्रात गेले होते. तेथे खिचडी खाऊन ही मुले बाहेर गेली. परंतु ते दुपारी 1 वाजेपर्यंत घरी न आल्याने याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली. तीनही बालकांचे अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाली. याशिवाय पौर्णिमा असल्याने नरबळीच्या शंकाही व्यक्त करण्यात आल्या. दिवसभर पोलिसांनी शोध मोहिम राबविली. 

संपूर्ण गवळीपुरा, इक्बाल नगर, आजूबाजूचा जंगलाचा परिसर सगळीकडे पोलिस दिवसभर शोध घेत होते. मात्र कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. यातच पोलिसांचे एक पथक सैलानी व परिसरात जाऊन शोध घेऊन आले. रात्री उशीरा अडीच वाजेच्या दरम्यान टिपू सुलतान चौकासमोरील एका घरासमोर उभ्या असलेल्या कारजवळ जाऊन पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संशय आला. यावेळी पोलिसांनी तातडीने कारचे दरवाजे उघडले. यावेळी दोन्ही मुले अत्यवस्थ अवस्थेत तर मुलगी सहर शुद्धीवर असलेली आढळून आली. यामध्ये शेख साहिल व शेख अजीज या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

घातपाताचा संशय नाही

सदर तीनही मुले अंगणवाडीतून आल्यानंतर खेळताना कारमध्ये शिरली, दरवाजे आतून बंद झाले आणि उन्हामुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. गाडीमध्ये ही दोनही मुले ओकारी केलेल्या अवस्थेत आढळले. त्यामुळे या प्रकरणात घातपाताचा संशय नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com