Ajit Pawar : येत्या पंधरा दिवसांमध्ये दोन मोठे राजकीय स्फोट; प्रकाश आंबेडकरांना नेमकं म्हणायचं काय?

prakash ambedkar
prakash ambedkarsakal media
Updated on

पुणेः येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये दोन मोठे स्फोट होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

सध्या अजित पवार यांच्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार भाजपमध्ये जाणार असं भाकित केलं जात आहे. विशेषतः ते मागच्या आठवड्यात अचानक नॉट रिचेबल झाल्याने सगळ्यांनाच संशय येतोय. परंतु अजित पवारांनी अशा बातम्यांना वावड्या म्हटलं आहे.

prakash ambedkar
Ajit Pawar : आमदार अपात्र ठरले तरी सरकारला काहीही फरक पडणार नाही; अजित पवारांनी मांडलं आमदारांचं गणित

दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये कुटुंबातील सदस्यांवर भाजपकडून दबाव येत असल्याचं शरद पवार म्हणाले असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. कुटुंबातील सदस्य भाजपमध्ये गेले तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं पवार म्हटले असल्याचं राऊतांनी सांगितलं.

आणखी महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील भाजपचे नेते सध्या अजित पवार यांचं गुणगाण गात असल्याचं दिसून येतंय. अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यावरुन काहीतरी शिजतंय असंच दिसून येत आहे.

आज बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पुढच्या पंधरा दिवसांमध्ये राज्यामध्ये दोन मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. दोन ठिकाणी दोन मोठे स्फोट होतील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. एका दाव्याबाबत अजित पवारांचं नाव राजकीय जाणकार जोडत आहेत. मात्र दुसऱ्या दाव्याबाबत काहीही स्पष्टता दिसून येत नाहीये.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे एका पुस्तक प्रकाशनासाठी आंबेडकर आले होते.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण, उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com