Maharashtra News : बेरोजगारीमुळे दररोज दोनजण राज्यात संपवितात आपले जीवन

राष्ट्रीय पातळीवर विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात बेरोजगारी आणि त्या अनुषंगाने वाढत जाणारे मृत्यू दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालले आहेत.
Ended Life
Ended Lifeesakal

मुंबई - राष्ट्रीय पातळीवर विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात बेरोजगारी आणि त्या अनुषंगाने वाढत जाणारे मृत्यू दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालले आहेत. गेल्या दोन वर्षांत राज्यात दररोज सरासरी दोनजण बेरोजगारीमुळे आत्महत्या करत असल्याचे ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या (एनसीआरबी) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी पाहिली तर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते.

‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत बेरोजगारीमुळे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याचे समोर आले आहे. २०२१ मध्ये देशात बेरोजगारीमुळे ३ हजार ५४१ आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी ७९६ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०२२ मध्ये देशातील एकूण आत्महत्यांचा आकडा ३१७० होता. त्यापैकी सर्वाधिक ६४२ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

आत्महत्यांच्या आकडेवारीत थोडी घट झाली असली तरी गेल्या दोन वर्षांत राज्यातील प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. याबाबत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी म्हणाले, ‘माणूस बेरोजगार असतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास कमी होतो. त्याचा जीवनावरील विश्वासही उडतो. कमीपणा आणि एकाकीपणामुळे आत्महत्या घडतात.

कोरोनाकाळात अनेकांना त्याचा अनुभव आला आहे. बरेचजण नैराश्याचे बळी ठरतात आणि जीवन संपवतात.नोकरी गेल्यावर कुटुंबीयांना त्याबाबत कसे सांगायचे? ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. भीती आणि कमीपणा न बाळगता, संकोच न करता आणि संयम न गमावता आपण त्याबाबत कुटुंबाला सांगायला हवे.’

सरकारने मध्यमवर्ग काढावा

कोणत्याही कंपनीने ठोस कारण नसताना आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकता कामा नये, यासाठी सरकारने मार्ग शोधायला हवा. युरोपमधील अपंगत्व कायद्यानुसार तुम्ही एखाद्याला अशा प्रकारे काढून टाकू शकत नाही. त्याशिवाय कर्मचाऱ्यांनी युनियन बेटिंग आणि कामाची चोरी थांबवून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कौशल्य विकासाबरोबरच मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रशिक्षणही सरकारने दिले पाहिजे.

कंपनीने काय करावे?

कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारायला हवी. कर्मचाऱ्यांनी इतर कामांसाठीही कौशल्य विकसित केले पाहिजे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर भर दिला पाहिजे, त्यामुळे कर्मचारी आणि कंपनी दोघांची उत्पादकता वाढेल.

समुपदेशकाची मदत घ्या

आपल्या घरातील समस्या मित्रांसोबत शेअर करा. जर ते शक्य नसेल तर ‘टेलिमानस’वर (टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक ः १४४१६) कॉल करा आणि समुपदेशकाशी बोला.

कशी मात कराल?

  • अनेकदा मोठ्या पदावर काम केलेले असते त्यातून मग छोट्या पदावर कसे काम करणार? असा विचार मनात येतो, तो काढावा. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा.

  • बऱ्याचवेळा नोकरी गेल्यावर लोकांना अन्यत्र काम विचारताना कमीपणा वाटतो. पण तसा नकारात्मक विचार करू नका.. बिनधास्त बोला.

  • नोकरी नसेल तर निराश होण्याऐवजी छोटासा व्यवसाय करावा. तुम्ही ज्या क्षेत्रात शिकलात त्याच क्षेत्रात काम केले पाहिजे असेही काही नाही.

राज्यातील स्थिती वर्ष व आत्महत्या

६२५ - २०२०

७९६ - २०२१

६४२ - २०२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com