२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू,नियमावली जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू, प्राध्यापकांना पेन्शन जाहीर

२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची मोठी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली महाविद्यालये उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांना दोन डोस घेणं आवश्यक आहे.

५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू होणार आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने गोष्टी पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सामंत म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेलं नाही, अशांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली.

सेट-नेट बाबत मोठा निर्णय

राज्यातील सेट-नेट पास झालेल्या प्राध्यापकांची पेन्शनची रक्कम थकित होती. ४ हजार १३३ प्राध्यापकांची पेन्शन थकल्याने याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलय. नियुक्त झालेल्या तारखेपासून या प्राध्यापकांना पेन्शनची रक्कम मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

Web Title: Uday Samant Declared Date Of Reopening Of College In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top