बंडाचं कारण राष्ट्रवादी-काँग्रेस; उदय सामंतांनी गुवाहाटीतून व्यक्त केली नाराजी

Uday Samant
Uday Samantesakal

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. असे मत शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी (Uday Samant expressed displeasure Maharashtra politics)व्यक्त केले आहे. त्यांच्या या नाराजीचा व्हिडीओ एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले. असा आरोप उदय सामंत यांनी यावेळी केला.

मित्रपक्षामुळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.असं असलं तरीही आजही ते शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेनेत झालेल्या राजकीय भुकंपामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधी बंड केल्याने उभी फूट पडली. पक्षातील ३७ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट करून बाहेर पडले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत देखील रविवारी एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com