Governor Koshyari : शरद पवारांनी भाषणात उल्लेख करून निषेध करायला हवा होता -उदयनराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara-MP-Chattrapati-Udayanraje-Bhosale
Governor Koshyari : शरद पवारांनी भाषणात उल्लेख करून निषेध करायला हवा होता -उदयनराजे

Governor Koshyari : शरद पवारांनी भाषणात उल्लेख करून निषेध करायला हवा होता -उदयनराजे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. त्याचबरोबर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानावरूनही वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता छत्रपती शिवरायांचे वंशज आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी या दोघांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

या विधानाबद्दल उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याला आधार काय असा प्रश्नही उपस्थित केला आहे. उदयनराजे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जुना झाला हे जेव्हा मी ऐकलं राज्यपालांच्या तोंडून तेव्हा मला एक क्षणभर काही कळलंच नाही. माझ्या मनात विचार आला की राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याला आधार काय? ज्या वेळी देशभरात अनेक राजे मुघलांना शऱण गेले होते, तेव्हा शिवाजी महाराज ही एकमेव व्यक्ती होती, जे त्यांच्या विरोधात गेले. "

उदयनराजे पुढे म्हणाले, "आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडून चालणार नाही, नाहीतर देशाचे तुकडे होतील. लोकशाहीचा ढाचा आहे त्याची संकल्पना शिवाजी महाराजांची होती. शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं म्हणून ते त्यांचं राज्य अशी ओळख होत नाही. ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. आत्ता सगळीकडे मीपणा झाला आहे. सगळं व्यक्तीकेंद्रीत झालं आहे. शिवाजी महाराज म्हणजे देवाचा अवतार मानला पाहिजे. त्यांचा अपमान हे निर्लज्ज लोक करत आहेत. त्यांच्यामुळे आपण लोकशाहीमध्ये मोकळा श्वास घेत आहोत. नाहीतर तुम्ही आम्ही आज गुलामगिरीमध्ये असतो."

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी आक्षेप घ्यायला हवा होता, अशी अपेक्षा व्यक्त करताना उदयनराजे म्हणतात, "दुसऱ्या देशात असं काही झालं की तिथले लोक पेटून उठतात. शिवाजी महाराज कोणत्याही एका पक्षाचे नव्हते. ज्या ठिकाणी कोश्यारींनी हे वक्तव्य केलं तिथे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. राज्यातल्या राजकारणातले वयाने ज्येष्ठ असे शरद पवार तिथं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी याचा उल्लेख करायला हवा होता. नितीन गडकरी होते, त्यांनीही बोलायला हवं होतं. ते का बोलले नाहीत, हे मला कळलं नाही. नरेंद्र मोदी रायगडावर छत्रपती शिवरायांना अभिवादन करायला गेले होते. त्यांनीही विचार करायला हवा. "