Chandrakant Khaire speaks on efforts to unite Uddhav and Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते याबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंनी तर "लवकरच बातमी देतो" असं म्हणत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचे कार्यकर्ते युतीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दोघांना एकत्र आणण्यासाठी नातेवाइकांचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.