महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा भाजपचा छुपा अजेंडा आहे, पण तो राबविण्याचा प्रयत्न मराठी भाषिक हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना याविरोधात आंदोलन करेल. मराठी भाषेसाठी या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हिंदी सक्तीविरोधात भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे बोलत होते.