
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओला दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे ओला दुष्काळ दौऱ्यावर जाणार आहेत.
आज (रविवारी) उद्धव ठाकरे औरंगाबादकडे आणि आदित्य कोकणाकडे रवाना होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओला दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यातील कानडगाव आणि वैजापूर तालुक्यातील गारज येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा लांजा तालुक्यामधील कुवे गावापासून सुरू होईल.