Shivsena : शिंदे-ठाकरे एकत्र येण्याबाबत केसरकरांचे सूचक विधान म्हणाले; लवकरच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Shivsena : शिंदे-ठाकरे एकत्र येण्याबाबत केसरकरांचे सूचक विधान म्हणाले; लवकरच...

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदार यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर पक्षात फुट पडली निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवलं. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांना वेगळी नावे दिली. इतकं सगळं झाल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आणि त्यासाठी काय प्रयत्न करावे असं शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या नंतर काही काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले गेले. या दोघांनी एकत्र येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. परंतु आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शिंदेगटातील मंत्र्यानेच व्यक्त केल्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर त्यासाठी ठाकरेंसमोर एक अट ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: Abdul Sattar: शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर? केसरकर सत्तारांबाबत म्हणाले...

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोकं कधीही सोडून जात नाहीत. त्यामुळे निश्चितपणे असं काही घडलेलं आहे, ज्यामुळे लोक नाराज झाली आणि बाहेर पडली आहेत. ती गोष्ट नेमकी काय घडली याचं जसं मी आत्मपरिक्षण केलं तसं उद्धव ठाकरे यांनीही त्याचं आत्मपरिक्षण करावं. जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

हेही वाचा: Sanjay Raut : 'नव्या वर्षात बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल' राऊतांचं भाकीत

दीपक केसरकर यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं कौतुक

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीला जाऊन साईंबाबांच दर्शन घेतलं. यावेळी शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे.


हेही वाचा: Urfi Javed: "तुमच्या कामांकडे लक्ष द्या",चित्रा वाघ यांच्या पोस्टला उर्फीचा कडक रिप्लाय